श्रावणसर
ओथंबल आभाळ ...आसमंत टपटपला... हरखली धरा...मृदगंध घमघमला... हरेल तृष्णा...चातक चिवचिवला... तृप्ताया मनास...श्रावण बरसला.
Thursday, 26 September 2013
Sunday, 16 September 2012
कळीचे फुल होताना
एक कळी, भल्या पहाटे
अलीरवाने जागी झाली
उघडताच नयन पाकळ्या
ओल्या ओल्या दवांत न्हाली
लसलसती हसती
ती मुग्धा, ती अबोली
धुंद असे स्वत:तच, अन
लाज वसे नित्य गाली
फुलपाखरे दिसता जवळी
मोहिनी ती घाबरली
शीतल येता वायूलहरी
कामिनी ती बावरली
नवा आसमंत, नवा सुगंध
जग तिजसाठी बदलले
प्रेम दवांत न्हावून
कळीचे एका फुल झाले
-सुहास भुसे
अलीरवाने जागी झाली
उघडताच नयन पाकळ्या
ओल्या ओल्या दवांत न्हाली
लसलसती हसती
ती मुग्धा, ती अबोली
धुंद असे स्वत:तच, अन
लाज वसे नित्य गाली
फुलपाखरे दिसता जवळी
मोहिनी ती घाबरली
शीतल येता वायूलहरी
कामिनी ती बावरली
नवा आसमंत, नवा सुगंध
जग तिजसाठी बदलले
प्रेम दवांत न्हावून
कळीचे एका फुल झाले
-सुहास भुसे
Wednesday, 5 September 2012
माझ्यासाठी वेड्या
माझ्यासाठी वेड्या कशास इतका तडफडतोस
तुझी सय कशी न येत मज, खरेच सांगते
मी तुझीच जाणूनही कशास अजाण बनतोस...
मी दूर आहे तुझ्यापासून फक्त शरीराने
मनात तुझ्या मी अन माझ्या अंतरी तुच वसतोस...
माझी आठवण आली तर डोळे मिटताच दिसेन
डोळे ताणून फुलाफुलात कशास मला शोधतोस...तुझी सय कशी न येत मज, खरेच सांगते
तू दूर कुठे, तू तर माझ्याच हृदयी राहतोस...
मी स्वत: ला कधीच अर्पण केले आहे तुला
रोज देवाकडे कशास मलाच मागतोस...
तुझ्या भेटीस नसले तरी स्वप्नात येईन रोज
चंद्रात माझा चेहरा पाहात कशास उगा जागतोस...
-सुहास भुसे
माळावरील वाटांवर
माळावरील गवतफुलांचा
सुगंध हृदयात भरत
मंद मंद सा वारा
वाहत होता
वाकुड्या वळणाच्या
वाटांवरुन तिच्या साथीन
तो मनरमणा चालत होता
..
त्यांच्या भावना ,
त्यांचा उत्साह
त्या वाटा-वाटांवरुन
दौडत होता
पहिल्या वाहिल्या
नवथर प्रेमाचा प्रपात
दोघांच्या
डोळ्यांतून बरसत होता
..
हृदयातील मुक्या
भावना
ओसंडणा-या
प्रेमाच्या खिडक्या
मोकळ्या करायच्या
होत्या
..
दोघांत त्या सुरवात
कोण करणार पण
अनामिक भीतीच्या
छायेत दोघेजण
..
ती अबोली, लाज
तिच्या गाली
तिची मुग्धता ती
सोडेना
तोही वेडा होता बोलघेवडा
शब्द पण त्याच्याही
तोंडून फुटेना
..
त्याने अनेकदा
केलेल्या नमस्कारांना जागून
अखेर तो गजाननच
मदतीला धावला
त्याच्या पवित्र
प्रेमाची लाज राखून
तो त्याच्या नवसाला
पावला
..
त्याचं मंदिरात दोघे
नतमस्तक झाले
डोळे मिटून देवाकडे
त्यांनी एकमेकानाच मागीतले
..
“तु काय मागितले ?” त्याने विचारले
तिने लाजून अंतरी
मोहरून
त्याच्या डोळ्यात
पाहिले
..
तिच्या डोळ्यात
उमटलेला तिचा चेहरा
त्याला न सांगता
उत्तर मिळाले
सुरवात अशी झाल्यावर
मात्र
त्यांना बोलायला
रानच मोकळे मिळाले
..
त्याचा शब्द शब्द
होता प्रेमान ओथंबलेला
तिचा अणुरेणु त्यात
न्हाऊन निघाला
तिच्या थरथरत्या
स्पर्शाने
तोही पुलकित झाला
..
मूक प्रेमिकांचा
देवाच्या दारात त्या
संवाद मग खूप रंगला
अव्यक्त प्रेमाचा
प्रेमग्रंथ त्यांचा
अखेर सुफळ संपूर्ण
झाला
-सुहास भुसे
धमालपुरची शाळा भाग- ३
धमालपुरची शाळा भाग- ३
राम राम गावकरी मंडळी ..
आमचे इद्यार्थी इतके करामती आणि डांबरट असतात की या गावचे नाव धमालपूर
ऐवजी डांबरटवाडी असायला हव होत अस वाटत कधी कधी
असो
योगेश देवकर
हे बेण जरा विपरीत बुद्धी असणार होत ..
याला ५वित प्रवेश देताना याच्या प्राथमिकच्या बाईंनी दिलेला फोटो सोबत
जोडत आहे.यावरूनच आपल्याला कल्पना येईल हे पात्र किती “ पहुची हुई चीज ” असेल याची.
याला अभ्यासा पेक्षा
कोणाचे कोणाशी समीकरण जुळले आहे आणि कोणाचा कोणाशी सिग्मा बोंड आहे ....कुणाला
कोणाने अचूक भाग जाईल अशाच गोष्टींत जास्त रस होता .
त्यातूनच त्याला
पुढे विज्ञानाची आवड निर्माण होऊन बेण डाक्टर झाल
याचा एक वर्गातला किस्सा पहा
गुरुजी : पोरांनो,सांगा 80+90 किती???
योगेश : 100......
गुरुजी : येडया... 80+90=170......
...
योगेश : ओ मास्तर काहि पण
शिकवू नका,लहानपणापासून आम्ही ऐकले आहे,
.
.
"अक्कड-बक्कड बंबे बो....80-90पुरे 100(सौ)
योगेश : 100......
गुरुजी : येडया... 80+90=170......
...
योगेश : ओ मास्तर काहि पण
शिकवू नका,लहानपणापासून आम्ही ऐकले आहे,
.
.
"अक्कड-बक्कड बंबे बो....80-90पुरे 100(सौ)
आमच्या शाळेत दहावी पास होऊन हे कार्ट पुढे
कालिजात गेल.
तिथ याचा एक किस्सा मला तिथल्या एका प्रोफेसरने सांगितला.
याला एक प्रोफेसर फार छळायचा...
एकदां योगेश ने त्या
फिजिक्सच्या प्रोफेसरच्या घरी फोन केला.
त्यांच्या पत्नीने फोन
उचलला आणि म्हणाल्या,
'गेल्या आठवड्यातच ते वारले.'
.
फिजिक्सच्या प्रोफेसरच्या घरी फोन केला.
त्यांच्या पत्नीने फोन
उचलला आणि म्हणाल्या,
'गेल्या आठवड्यातच ते वारले.'
.
योगेशने दुस-या दिवशी पुन्हा फोन केला.
प्रोफेसरच्या पत्नीने फोन उचलला आणि म्हणाल्या,
'मी कालच सांगितलं ना की ते गेल्या आठवड्यात वारले.'
योगेशने पुन्हा तिस-या दिवशी फोन केला.
प्रोफेसरच्या पत्नीने फोन घेतला आणि म्हणाल्या,
प्रोफेसरच्या पत्नीने फोन उचलला आणि म्हणाल्या,
'मी कालच सांगितलं ना की ते गेल्या आठवड्यात वारले.'
योगेशने पुन्हा तिस-या दिवशी फोन केला.
प्रोफेसरच्या पत्नीने फोन घेतला आणि म्हणाल्या,
'मी एकदा सांगितलं ना की ते वारले म्हणून,
मग पुन:पुन्हा फोन
का करतोयस?
.
मग पुन:पुन्हा फोन
का करतोयस?
.
योगेश : “ काही नाही...
ऐकून जरा बरा वाटतं
ना, म्हणून.”
ऐकून जरा बरा वाटतं
ना, म्हणून.”
Wednesday, 29 August 2012
जिंकतो तोच
नांगराचा फाळ निष्ठुरपणे
मातीचा उर चिरत जातो
मोकळ्या ढाकळ्या त्या तनुत
मग हिरवागार कोंब फुलतो
टाकीचे मस्तकावरील घाव
दगड किती निर्धाराने सोसतो
तुकडे कपचे पडत त्याला
ईश्वराचा आकार येतो

अस्तित्वावर होणा-या घाल्यांनी
अभिमान राख राख होतो
त्या सत्वहीन राखेतुनच पण
फिनिक्स नवी भरारी घेतो
नवनवे आघात पचवूनच
मनास एक कणखरपणा येतो
अडचणींचे डोंगर खोदुनच
मनगटात नवा जोश येतो
या संकटांनी मग तुही
कशाला खचून जातो
' जिंकतो तोच ' नव्या उमेदीने
काळाशी जो टक्कर देतो
-सुहास भुसे
मातीचा उर चिरत जातो
मोकळ्या ढाकळ्या त्या तनुत
मग हिरवागार कोंब फुलतो
टाकीचे मस्तकावरील घाव
दगड किती निर्धाराने सोसतो
तुकडे कपचे पडत त्याला
ईश्वराचा आकार येतो

अस्तित्वावर होणा-या घाल्यांनी
अभिमान राख राख होतो
त्या सत्वहीन राखेतुनच पण
फिनिक्स नवी भरारी घेतो
नवनवे आघात पचवूनच
मनास एक कणखरपणा येतो
अडचणींचे डोंगर खोदुनच
मनगटात नवा जोश येतो
या संकटांनी मग तुही
कशाला खचून जातो
' जिंकतो तोच ' नव्या उमेदीने
काळाशी जो टक्कर देतो
-सुहास भुसे
Sunday, 26 August 2012
धमालपुरची शाळा भाग-२
धमालपुरची शाळा भाग -२
माझ्या इद्यार्थी मित्रांनो,
माझ्या इद्यार्थी मित्रांनो,
या लेखमालेत आपण
धमालपुरच्या शाळेतील काही नमुनेदार इद्यार्थ्यांचे मासलेवाईक किस्से पाहत
आहोत..आणि आजचा आपला इद्यार्थी आहे ...
२) विजय ढेरे.
.
इजू बद्दल बोलावे तेवढे थोडे आहे.
लहानपणापासून अभ्यास सोडून इतर अनेक गोष्टींत झळकणारे एक छंदी-फंदी व्यक्तिमत्व.
कोणती विद्यार्थिनी कोठे राहते तिचा पत्ता अशा तपशीलांनी भरलेली याची वही एकदा मला सापडली
तेव्हा मी याची जाम धुलाई केलि होती.
लहान असताना इजू
अतिशय डेअरिंगबाज होता. पण हल्ली त्याची बायको त्याचे फार हाल करते असे ऐकून आहे.
परवा शिवाजी (वाघमारे) सांगत होता विजूचा एक किस्सा.
एकदा आपल्या दारुड्या मित्रांचे ( कोण मित्र
ते सांगत नाही आपण ओळखून घ्या ) ऐकून विजुने जिवावरचे धाडस केले.
विजू(बायकोला) : “ काय ग
ये ....फार झाल तुझ नाटक ....आजपासून तू सर्व भांडी धुवायची ..धूण धुवायचं
...उत्तम स्वयंपाक करून मला जेवायला वाढायचं ...माझ्या कपड्यांना कडक इस्त्री करून
ठेवायची ...काय ग ये समजल का नाही ....आज मला योगेश देवकर च्या पार्टीला जायचं आहे
...सांग बर मग माझ्या बुटाला pa^laISa कोण करणार ..? “
बायको : “ ते मी सांगते
सर्व ...पण आधी तुम्ही पलंगाच्या बाहेर तर या “
ख्या ख्या ख्या
या माझ्या हसण्यातून माझी माझ्या या माजी इद्यार्थ्याविषयीची सहानभूती
जाणवलीच असेल ..
..
तर आता शाळेतला एक किस्सा सांगतो.
एकदा आमचे ग शी साहेब शाळा तपासणीला आले होते ....आले ते थेट आमच्या ५
वीच्या वर्गात ....
ग शी : “
विद्यार्थ्यांनो मी तुम्हाला आता काही प्रश्न विचारेन “
इजू नेहमी मागच्या बाकावर बसून गोंधळ घालत असे ...आजही त्याची टंगळ मंगळ
सुरूच होती ते पाहून साहेबांनी त्यालाच आधी उभे केले.
ग.शी. : “ ह बाळा तू मला
कोणत्याही ५ प्राण्यांची नावे सांग बर .....”
विजय : “ दोन हत्ती आणि
तीन सिंह ..”
Subscribe to:
Posts (Atom)










