धमालपुरची शाळा भाग -२
माझ्या इद्यार्थी मित्रांनो,
माझ्या इद्यार्थी मित्रांनो,
या लेखमालेत आपण
धमालपुरच्या शाळेतील काही नमुनेदार इद्यार्थ्यांचे मासलेवाईक किस्से पाहत
आहोत..आणि आजचा आपला इद्यार्थी आहे ...
२) विजय ढेरे.
.
इजू बद्दल बोलावे तेवढे थोडे आहे.
लहानपणापासून अभ्यास सोडून इतर अनेक गोष्टींत झळकणारे एक छंदी-फंदी व्यक्तिमत्व.
कोणती विद्यार्थिनी कोठे राहते तिचा पत्ता अशा तपशीलांनी भरलेली याची वही एकदा मला सापडली
तेव्हा मी याची जाम धुलाई केलि होती.
लहान असताना इजू
अतिशय डेअरिंगबाज होता. पण हल्ली त्याची बायको त्याचे फार हाल करते असे ऐकून आहे.
परवा शिवाजी (वाघमारे) सांगत होता विजूचा एक किस्सा.
एकदा आपल्या दारुड्या मित्रांचे ( कोण मित्र
ते सांगत नाही आपण ओळखून घ्या ) ऐकून विजुने जिवावरचे धाडस केले.
विजू(बायकोला) : “ काय ग
ये ....फार झाल तुझ नाटक ....आजपासून तू सर्व भांडी धुवायची ..धूण धुवायचं
...उत्तम स्वयंपाक करून मला जेवायला वाढायचं ...माझ्या कपड्यांना कडक इस्त्री करून
ठेवायची ...काय ग ये समजल का नाही ....आज मला योगेश देवकर च्या पार्टीला जायचं आहे
...सांग बर मग माझ्या बुटाला pa^laISa कोण करणार ..? “
बायको : “ ते मी सांगते
सर्व ...पण आधी तुम्ही पलंगाच्या बाहेर तर या “
ख्या ख्या ख्या
या माझ्या हसण्यातून माझी माझ्या या माजी इद्यार्थ्याविषयीची सहानभूती
जाणवलीच असेल ..
..
तर आता शाळेतला एक किस्सा सांगतो.
एकदा आमचे ग शी साहेब शाळा तपासणीला आले होते ....आले ते थेट आमच्या ५
वीच्या वर्गात ....
ग शी : “
विद्यार्थ्यांनो मी तुम्हाला आता काही प्रश्न विचारेन “
इजू नेहमी मागच्या बाकावर बसून गोंधळ घालत असे ...आजही त्याची टंगळ मंगळ
सुरूच होती ते पाहून साहेबांनी त्यालाच आधी उभे केले.
ग.शी. : “ ह बाळा तू मला
कोणत्याही ५ प्राण्यांची नावे सांग बर .....”
विजय : “ दोन हत्ती आणि
तीन सिंह ..”

No comments:
Post a Comment