माणसाचे जीवन म्हणजे अनादी अनंत दु:खाची गाथा असे अनेक तत्वज्ञ, संतांचे मत असते. प्रपंच, संसार आणि एकूणच अवघे जग म्हणजे भवसागर, हा भवसागर प्रत्येक मनुष्य प्राण्याला पार करावाच लागतो, आणि तो एक अतिशय वेदनामय अनुभव असतो. आणि यासाठीच अनेक संत तत्वज्ञ मुक्ती हे आपल्या साधनेचे, जीवनाचे अंतिम ध्येय मानतात आणि त्यासाठी प्रयत्नशील राहतात. “मुक्ती “ या दु:खातून, या वेदनामय जगण्यातून, या मनुष्य जन्मातून आणि ८४ लक्ष योनींच्या प्रवासातून. तथापि या सर्वात आमच्या तुकाराम महाराजांचा एक अभंग मात्र अतिशय वेगळा आणि म्हणूनच उठून दिसणारा ...
खरच का माणसाचे जीवन इतके दु:खाने भरले आहे ? यासंदर्भात एक दृष्टांत प्रसिद्ध आणि माझा फार आवडता आहे. एकदा एक शिक्षक वर्गात एक प्रयोग करतात. वर्गात आल्याआल्या फळ्यावर एक कागद टांगतात. पांढर्या शुभ्र कागदावर मध्यभागी एक छोटासा काळा ठिपका असतो. आणि मग प्रत्येक विद्यार्थ्याला उठवून प्रश्न विचारतात, “सांग बर बाळ, तुला काय दिसतेय समोर “ जवळ जवळ अख्ख्या वर्गाला उठवून हा प्रश्न विचारल्यानंतर प्रत्येकाचे उत्तर एकच असते.”गुरुजी आम्हाला एक काळा ठिपका दिसतोय.” शिक्षक त्यावर उत्तरतात, ” बाळांनो हा इतका मोठा पांढराशुभ्र कागद तुम्हाला कोणालाच दिसला नाही आणि सर्वांना फक्त काळा ठिपकाच तेवढा दिसला. जीवनाचे देखील असेच असते बाळांनो. या भल्या मोठ्या कागदासारखे त्यात सुख पसरलेले असते. तथापि ते कोणाला दिसत नाही आणि हा दु:ख काळा ठिपका मात्र प्रत्येकाला प्रकर्षाने दिसतो. बाळांनो म्हणून दु:ख कवटाळून बसू नका. सुख पहा ...कटाक्षाने ......”
सुख हे शोधावे लागत नाही. ते असतेच , आजूबाजूला पसरलेले असते...भल्या पहाटे मोहक गुलाबावर दवबिंदू बनून ते चमकत असते. कोवळ्या उन्हात नवी तकाकी ल्यायलेल्या हिरवाळीच्या रुपाने ते डोलत असते. तापलेल्या धरित्रीची तृष्णा शांत करणार्या थबथबलेल्या ढगांतून कोसळणार्या पावसाच्या रुपाने ते बरसत असते. हिरव्यागार झाडीतून वाहणारया खळाळत्या प्रपातातून ते वाहत असते. प्रसन्न सकाळ, अंगणात टाकलेला सडा, हलकीशी रांगोळी, स्वस्तिक आणि तुळशीला फेरी घालणारी सुवासिनी अशा प्रतिकांतून ते बोलत असत. माळावरील वाटांवरून चालताना छोट्या छोट्या गवतफुलांतून ते खुणावत असत. भावनांचा कल्लोळ करणाऱ्या कवितांतून ते आपल्याशी गुज साधत असत. आणखी एखाद्या दर्जेदार साहित्यकृतीतून ते संवाद साधत असत. बिस्मिल्लाची शहनाई, रवीशंकरांची सतार बनून ते आपल्या हृदयाच्या तारा छेडत असत. माणिक वर्मांचा मालकंस, पंडित भीमसेन जोशींची भैरवी बनून ते आपल्या कानात कोसळत असत. इतक विश्वव्यापक आणि सर्वसमावेशक अस हे सुख असत.
तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी
‘ न लगे मुक्ती ‘ आम्हास पुन्हा पुन्हा हा मनुष्य जन्म दिलास तरी काही हरकत नाही नव्हे त्यातच आमचे सौख्य सामावले आहे. अर्थात या अभंगाचा संदर्भ वेगळा आहे. तरी तुकाराम मुक्ती लाथाडून मनुष्य जन्मच पुन्हा पुन्हा मागतात इतकेच महत्वाचे.
खरच का माणसाचे जीवन इतके दु:खाने भरले आहे ? यासंदर्भात एक दृष्टांत प्रसिद्ध आणि माझा फार आवडता आहे. एकदा एक शिक्षक वर्गात एक प्रयोग करतात. वर्गात आल्याआल्या फळ्यावर एक कागद टांगतात. पांढर्या शुभ्र कागदावर मध्यभागी एक छोटासा काळा ठिपका असतो. आणि मग प्रत्येक विद्यार्थ्याला उठवून प्रश्न विचारतात, “सांग बर बाळ, तुला काय दिसतेय समोर “ जवळ जवळ अख्ख्या वर्गाला उठवून हा प्रश्न विचारल्यानंतर प्रत्येकाचे उत्तर एकच असते.”गुरुजी आम्हाला एक काळा ठिपका दिसतोय.” शिक्षक त्यावर उत्तरतात, ” बाळांनो हा इतका मोठा पांढराशुभ्र कागद तुम्हाला कोणालाच दिसला नाही आणि सर्वांना फक्त काळा ठिपकाच तेवढा दिसला. जीवनाचे देखील असेच असते बाळांनो. या भल्या मोठ्या कागदासारखे त्यात सुख पसरलेले असते. तथापि ते कोणाला दिसत नाही आणि हा दु:ख काळा ठिपका मात्र प्रत्येकाला प्रकर्षाने दिसतो. बाळांनो म्हणून दु:ख कवटाळून बसू नका. सुख पहा ...कटाक्षाने ......”
अतिशय बोलके आणि सुंदर उदाहरण आहे. माणसाच्या जीवनावर मोठ्या मोठ्या तत्वज्ञानपर लेखांनी प्रकाश पडणार नाही पण या छोट्याश्या उदाहरणात जीवनाचे सार सामावले आहे. दु:खांचा बाऊ करू नका, त्यांना सामोरे जा. “ दु:ख भोगणे “ मराठी भाषेतला हा वाक्प्रचार मला फार आवडतो. भोगणे ...उपभोग घेणे ...या भाषेत आणि या संस्कृतीत दु:ख हि देखील एक भोगण्याची चीज आहे. त्यामुळे त्याला कितपत महत्व द्यायचे हे ज्याने त्याने ठरवावे.
सुख हे शोधावे लागत नाही. ते असतेच , आजूबाजूला पसरलेले असते...भल्या पहाटे मोहक गुलाबावर दवबिंदू बनून ते चमकत असते. कोवळ्या उन्हात नवी तकाकी ल्यायलेल्या हिरवाळीच्या रुपाने ते डोलत असते. तापलेल्या धरित्रीची तृष्णा शांत करणार्या थबथबलेल्या ढगांतून कोसळणार्या पावसाच्या रुपाने ते बरसत असते. हिरव्यागार झाडीतून वाहणारया खळाळत्या प्रपातातून ते वाहत असते. प्रसन्न सकाळ, अंगणात टाकलेला सडा, हलकीशी रांगोळी, स्वस्तिक आणि तुळशीला फेरी घालणारी सुवासिनी अशा प्रतिकांतून ते बोलत असत. माळावरील वाटांवरून चालताना छोट्या छोट्या गवतफुलांतून ते खुणावत असत. भावनांचा कल्लोळ करणाऱ्या कवितांतून ते आपल्याशी गुज साधत असत. आणखी एखाद्या दर्जेदार साहित्यकृतीतून ते संवाद साधत असत. बिस्मिल्लाची शहनाई, रवीशंकरांची सतार बनून ते आपल्या हृदयाच्या तारा छेडत असत. माणिक वर्मांचा मालकंस, पंडित भीमसेन जोशींची भैरवी बनून ते आपल्या कानात कोसळत असत. इतक विश्वव्यापक आणि सर्वसमावेशक अस हे सुख असत.
मित्रांनो, माणसाच्या जन्माला येऊन जर काही मिळवायचं असेल जर काही कमवायच असेल ते तर ते म्हणजे हे सुख पाहण्याची ती दिव्यदृष्टी , ती रसिकता. आपल्या भोवताली छोट्या छोट्या गोष्टींत विखुरलेले हे सुख पाहायला शिका. तुमच जीवन एक भवसागर राहणार नाही तर ती एक नितांतरमणीय जीवनसरिता बनेल. आणि मग बघा तुमच आयुष्य दु:खाच नामोनिशान नसणारी एक आनंद यात्राच बनून जाईल.
सुहास भुसे
सुहास भुसे
(१४-८-२०१२)

No comments:
Post a Comment