धमालपुरची शाळा- भाग १
हुश्श्य ..!!
अहो वात आणलाय या
कार्ट्यांनी ...!!
आमच्या शाळेतल्या
विद्यार्थ्यांनी हो ...
अहो इतके नाठाळ आणि
टवाळ विद्यार्थी जगाच्या पाठीवर दुसऱ्या कोणत्या शाळेत नसतील.
शाळेत गुरुजींना आणि
घरी पालकांना अगदी नाकी नउ आणले आहेत यांनी..
या लेखमालेतून म्हटल
या पोरांचे काही नमुनेदार आणि मासलेदार किस्से तुम्हाला सांगावेत.....वाचा आणि या
उनाड पोरांना कसे ताळ्यावर आणायचे याचा काही मार्ग सुचला तर आम्हाला सांगा.
..
..
१) विध्यार्थी :- अनिल काळे .
हा एक जुना विद्यार्थी आहे. बरीच वर्षे एकेका
वर्गात काढून त्याने आपले शाळेवरचे प्रेम सिद्ध केले होते. सध्या दहावीत ५ वेळा
नापास झाल्यानंतर स्वत: ची चहाची टपरी याने सुरु केलि आहे . पण त्यातला किमान ५०
कप चहा तरी रोज स्वत: च पितो अशी वदंता आहे.
याचा एक किस्सा सांगतो. अनिलला एकदा मधल्या
सुट्टीत ग्राउंड वर कुल्फी विकणाऱ्या फेरीवाल्याने पकडून माझ्याकडे आणले. आता याने
काय नवीन खोडी केलि म्हणून त्याच्याकडे चौकशी केलि असता त्याने जी हकीकत
पुढीलप्रमाणे..
त्याने मोजून ५ कुल्फ्या खाल्ल्या.
फेरीवाला म्हटला बर आहे.
चांगल गिऱ्हाईक आहे.
हातोहात चांगला धंदा झाला
अनिल ने ऐटीत कुल्फ्या खाल्या आणि तसाच ऐटीत
तो पुढे निघाला.
त्यावर कुल्फिवाल्याने त्याला थांबवले आणि
विचारले,
“ अरे पैसे कोण देणार ? “
त्यावर अनिलने जे मासलेवाईक उत्तर दिले
त्यावरून तुम्हाला कळेल कि आमच्या शाळेतली पोर कशी नमुनेदार आहेत ते ..
अनिल त्याला म्हणाला,
“ कसले पैसे ? “
कुल्फीवाला म्हणाला,
“अरे तू ५ कुल्फ्या खाल्या नां, त्याचे पैसे ..”
त्यावर अनिल म्हणाला ऐटीत
“ पैसे बैसे काही मिळणार नाहीत. माझ्या आईने सांगितलंय खायचा प्यायचा काहीही
लाड चालेल पैश्याचा लाड अजिबात चालणार नाही.”


हाहाहाहाहाहा , अनिलराव १० वि ला ५ वेळा नापास, आमच्या शाळेत एक पोरगा २ वर्ष नापास झाला होता, म्हणून आमची कबड्डी ची टीम एकदम मजबूत असायची.
ReplyDeleteहा हा हा ...
ReplyDeleteआणि इथे बघ हा ५ वेळा नापास झाला म्हणजे यांची टीम किती मजबूत असेल ...
जुनिअर च्या टीम ला यांनी हरवल होत एकदा .