गात्र गात्रे माझी न्हाउनी त्यात निघती
डोळ्याला भिडवत डोळा मान अशी झटकते ती
मागे सारलेल्या अवखळ बटा पुन्हा भालावर ढळती.
तिचे नयन जीवनाच्या सौंदर्याची जाणीव करून देती
अंधाऱ्या निरव रात्रीतली ती मौतीक्के तेजाळती.
प्राजक्त फुलांचा गजरा माळलेली तिपेडी वेणी
सोनेरी उन्हातली काळी नागीण जशी वळवळती.
मिटल्या डोळ्यांस तिच्या आगमाची वार्ता देती
संगीतात न्हाती, छुमछुमती तिची पैंजणे सळसळती.
तिच हसण, मृदू, सुंदर अन अस निरागस
माझा राग, माझे रुसवे आपसूक त्यात पाघळती.
तिच बोलण अस निष्पाप, माझ्या लटक्या तक्रारी विरघळती
किनार् यावरची वाळू धुवून नेणारी लाट जशी फेसाळती.
हि कोण सुंदरा, मृगनयना, कोण ही चंचला
माझ्या काळजातली अत्तराची कुपी ती दरवळती..
सुहास भुसे.


guruji aamchya manala tumchya shabdanchya sarinni chimb bhijwale......
ReplyDeleteधन्स अनिल ...
ReplyDeleteधन्स हे धन्यवादचे लघुरूप एका ठिकाणी वाचण्यात आले.
आणि फारच आवडले.
आपल्या स्तुतीने नवीन लेखनास बळ मिळेल.
ही आपणांस सुप्त धमकी वाटणार नाही आशी आशा आहे...
सुंदर !
ReplyDeleteधन्यवाद चिन्मय सर...
ReplyDeleteमाझ्या ब्लोग ला भेट दिल्याबद्दल आणि माझ्या कवितांची वाखाणणी केल्याबद्दल .......!!